Breaking News

अल्पसंख्याक मंत्रालयातर्फे १.३१ लाख विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाने २०१७-१८ या वित्तीय वर्षात अल्पसंख्याक समुदायाच्या १.३२ लाख शाळांमधील विद्यार्थिनींना तब्बल ७५ कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. गतवर्षीपेक्षा चालू वित्तीय वर्षात वाटप केलेल्या शिष्यवृत्तीचे प्रमाण ४ टक्के अधिक असल्याची माहिती यावेळी मंत्रालयातर्फे देण्यात आली. केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्रालयांतर्गत चालवण्यात येणाऱ्या 'मौलाना आझाद एज्युकेशन फाऊंडेशन(एमएईएफ) तर्फे गुणवंत विद्यार्थिनींसाठी 'बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती' ही योजना राबवण्यात येते.