जातेगावचे सरपंच गायकवाड यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव
जामखेड ता. प्रतिनिधी - तालुक्यातील जातेगावचे सरपंच पोपट गायकवाड यांच्यावर नऊ सदस्यांपैकी सहा ग्रामपंचायत सदस्यांनी तहसिलदारांकडे अविश्वास ठराव दाखल केला. त्यानंतर सहा सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाले.
जातेगावची ग्रामपंचायत तालुक्यातील एक प्रतिष्ठीत ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीमध्ये एकूण नऊ सदस्य आहेत. सरपंचपद हे इतर मागास वर्गातील असून, पाच वर्षांसाठी आहे. दरम्यान, नऊ सदस्यांपैकी दिपाली गर्जे, आशा गायकवाड, रविराज गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, कौशल्या गायकवाड, पुजा पोळ यांनी सरपंच पोपट गायकवाड हे सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात, गावात स्वच्छता अभियान राबविले जात नाही आदी मुद्दे उपस्थित करून सरपंच गायकवाड यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला. निवडणूकीनंतर सत्ता स्थापन करतांना अडीच अडीच वर्षे सत्तेत सरपंचपद वाटून घ्यावे, असे ठरले होते. त्यानुसार अडीच वर्षांपासून पोपट गायकवाड हे सरपंचपद भुषवित आहेत. सरपंच गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक म्हणून ओळखले जातात. अडीच वर्षे होऊनही पोपट गायकवाड यांनी राजीनामा न दिल्याने ग्रामपंचायत सदस्या दिपाली गायकवाड यांच्या पुढाकारातून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जातेगाव ग्रामपंचायतीच्या सदस्यांची एकजूट केली. मंगळवारी {दि. १०} हसीलदार विजय भंडारी यांच्याकडे अविश्वास ठराव सादर केला आहे. तहसीलदार भंडारी यांनी अविश्वास ठराव दाखल करून घेतला असून याबाबत जातेगाव बोलविली असल्याचे तहसीलदार भंडारी यांनी सांगितले.