Breaking News

श्रीगोंदा शहरात संयुक्त जयंती उत्साहात साजरी

शहरात कैकाडी महाराज यांची 111 वी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती तसेच महात्मा ज्योतीराव फुले यांची 191 वी जयंती संयुक्तरित्या श्रीगोंदा येथील शनिचौकात कैकाडी समाज संघटना आणि बी.एम ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. फुले आंबेडकर पुरोगामी चळवळीचे काम पाहनारे व तालुकाभर महानवांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करणार्‍या बी.एम ग्रुपचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा शहरात प्रबोधनाचे कार्यक्रम घेत महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करीत शोभायात्रा काढण्यात आली.

यावेळी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे सहा. फौजदार महावीर जाधव व नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून संयुक्त जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोपट खेतमाळीस, अशोक आळेकर, अमीन शेख, बाळासो महाडीक, जालिंदर घोडके, भागचंद घोडके, डॉ. सुवर्णा होले, सचिन माने, अरविंद कापसे, टिळक भोस, सुजित गायकवाड, सुरेश भंडारी, सुरज घोडके, सतीश मखरे, अमर घोडके, उदय माने, गोपीचंद लबडे, संतोष खेतमाळीस, हनुमंत माने, कुणाल जाधव, स्वप्निल जाधव, माऊली जाधव, भैय्या जाधव, प्रवीण जाधव, दिलिप गायकवाड, प्रकाश गायकवाड, सुरज गायकवाड, अजय जाधव, सचिन जाधव, विशाल गायकवाड, लाला जाधव, शंकर जाधवसह बी.एम ग्रुपचे सर्व कार्यकारिणी सदस्य व पदाधिकारी उपस्थीत होते.