Breaking News

विरशैव लिंगायत समाजाच्यावतीने महात्मा बसवेश्‍वर यांचा जयंती उत्सव साजरा

येथील विरशैव लिंगायत समाजाच्यावतीने महात्मा बसवेश्‍वर यांची जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम विठ्ठल मंदिर येथे बसवेश्‍वरांच्या मूर्तीस सकाळी अभिषेक घालण्यात आला.


सकाळी 11 वा. तहसील कार्यालयात तहसीलदार विजय भंडारी तसेच समाज बांधवांनी बसवेश्‍वरांच्या प्रतिमेस हार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती विजय डोंगरे यांनी दिली. येत्या रविवारी समाजाच्या वतीने भव्य मिरवणूकीसह आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अनिल लोखंडे यांनी दिली. तरी सर्व समाजबांधवांनी या मिरवणुकीस उपस्थित राहण्याचेे अवाहन करण्यात आले आहे.