Breaking News

आंबेडकर जयंतीनिमित्त युक्रांदच्या वाचनालयास पुस्तकांची भेट


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत अनेक पुस्तकप्रेमींनी राशिन येथील युवक क्रांती दल सार्वजनिक वाचनालयास पुस्तकांची भेट दिली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असुन त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. युक्रांदचे राज्य संघटक मनोहर जांबुवंत, व्यावसायिक माऊली सायकर, विठ्ठल सायकर तसेच राशिन परिसरातील अनेक पुस्तकप्रेमींनी ही भेट वाचनालयास दिली. संचालक किशोर जाधव, किरण पोटफोडे, वशिम काझी, विनोद सोनवणे, कमलाकर शेटे, सागर जाधव, मयुर धनवडे, दादासाहेब राऊत आदी युक्रांद कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.