राष्ट्रपिता महात्मा फुले जयंती उत्साहात
राहुरी (प्रतिनिधी) राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीदिनी राहुरी शहरात विविध सामाजिक संघटना व परिवर्तन विचारांच्या कार्यकर्त्यांनी क्रांतीबा फुलेंना विनम्र अभिवादन केले शहरातून सायंकाळी ६ वा.आकर्षक विद्युत रोषणाईने सजविलेल्या रथातून क्रांतीबा फुलेंच्या पुतळ्याची मिरवणूक काढली होती प्रारंभी स्टेशन रोडवरिल महात्मा फुले चौकात उभारलेल्या मंचावर क्रांतीबा फुले,सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. मा खा प्रसाद तनपुरे व शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्यासह विविध पक्ष व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पन करुन मिरवणुकीचे स्वागत केले.
सवाद्य आकर्षक रोषनाईने नटलेल्या व परिवर्तन विचारांनी सजविलेले रथ मिरवणूक मार्गावर निघाले प्रारंभ स्टेशन रोड,शनिचौक,राहुरी नगरपरिषद कार्यालय,छत्रपती शिवाजी चौक,जुनीपेठ,शुक्लेश्वर चौक,प्रगतीशाळा,पृथ्वी कॉर्नर मार्गे नवीपेठ व पून्हा महात्मा फुले चौक येथे मिरवणूक शेवट झाला संपूर्ण मिरवणूक मार्गावर शहरातील विविध सामाजिक संघटना पदाधिकारी नगरसेवक यांनी रथाचे स्वागत करुन फुलेंच्या प्रतिमेस अभिवादन केले
मिरवणूक मधे महात्मा फुले समता परिषद,संत सावता माळी विचार मंच,संभाजी ब्रिगेड,छावा संघटना,बहुजन क्रांती मोर्चा,कोळी समाज संघटना आदींसह समविचारी परिवर्तनवादी संघटना सहभागी झाल्या होत्या.