भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील साक्षीदाराचा संशयास्पद मृत्यू
पुणे : महाराष्ट्राला हादरवून सोडणार्या भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील साक्षीदार असलेल्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. यामुळे विविध संघटनांनी आक्रमक होत आरोपींना तत्काळ अटक करा, अशी मागणी केली आहे.
भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी रोजी दंगल उसळली होती. त्यात सकट परिवाराचे घर जाळण्यात आले होते आणि त्या जाळपोळीची पूजा सकट ही साक्षीदार होती. या हिसाचारानंतर सकट कुटुंबीय हे जवळील वाडा या गावात राहायला गेले होते. याच वाडा गावाजवळील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान, भीमा कोरेगाव प्रकरणात साक्षीदार असल्याने तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबियाकडून केला जातो आहे. पूजाचा भाऊ जयदीप सकट याने हा आरोप केला आहे.
गेल्या 2 दिवसांपासून पूजा बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर रविवारी विहिरीत तिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, पूजाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला असून, 9 जणांच्या विरोधात कुटुंबियांकडून पोलिसात तक्रारही देण्यात आली आहे. त्यातील 2 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, पूजाच्या कोरेगाव संशयास्पद मृत्यूमुळे विविध संघटनांनी आक्रमक भूमिका घेत आरोपींना तत्काळ अटक करा, अशी मागणी केली आहे.