Breaking News

“प्रसाद शुगर’चे प्रतिटन 1800 रुपये खात्यावर वर्ग

4 लाख टनाचे गाळपाचे उद्दिष्ट पार केलेल्या वांबोरी येथील प्रसाद शुगरने मार्च 2018 अखेर गाळप केलेल्या उसाचे पेमेंट 1 हजार 800 रूपये प्रति टनाप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले आहे. उर्वरित 300 रूपये साखरेच्या भावात सुधारणा झाल्यानंतर जसा आर्थिक निधी उपलब्ध होईल. त्यानुसार दिले जातील, अशी माहिती प्रसाद शुगरचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष प्राजक्‍त तनपुरे यांनी दिली.