इस्रोकडून नेव्हिगेशन सॅटेलाईटचे यशस्वी प्रक्षेपण
श्रीहरीकोटा - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून गुरुवारी सकाळी 04.04 मिनिटांनी आपल्या इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटॅलाईटचे (आयआरएनएसएस-1आय) यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. हा उपग्रह पीएसएलव्ही-सी 41 अग्नीबाणाच्या सहाय्याने आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपित करण्यात आला.
आयआरएनएसएस-1आय हा उपग्रह आयआरएनएसएस-1ए ची जागा घेईल. बदली उपग्रह पाठवण्याची ही इस्रोची दुसरी वेळ आहे. यापूर्वी ऑगस्ट 2017 मध्ये आयआरएनएसएस-1एचचे प्रक्षेपण अयशस्वी झाले होते. आयआरएनएसएस-1आयमुळे जलवाहतूक क्षेत्राला मदत होईल. यात समुद्री जलवाहतुकीबरोबरच मॅप आणि सैन्य क्षेत्रालाही मदत मिळेल. हा उपग्रह इस्रोच्या नाविक प्रणालीचाच एक भाग आहे.