Breaking News

महाराष्ट्रदिनी जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा


राहुरी : महाराष्ट्र व कामगारदिनानिमित्त {दि.१} राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौकात सायंकाळी ७ वा. जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. १ मे २०१८ रोजी लहान व मोठ्या गटात सामूहिक व सोलो प्रकारात जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा संपन्न होणार आहे. शिवचरित्रकार हसन सय्यद यांच्याकडून पारितोषिके दिली जाणार आहेत.