राहुरी तालुका प्रतिनिधी - महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौकात १ मे २०१८ रोजी सायंकाळी ७ वा. जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. १ मे २०१८ रोजी लहान व मोठ्या गटात सामूहिक व सोलो प्रकारात जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा संपन्न होणार आहे. मोठा गट सामूहिक नृत्यासाठी प्रथम बक्षीस ५००१ रु चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष गणेश भांड, द्वितीय बक्षीस ४००१ रु पोलिस उपनिरीक्षक मनोज शिंदे व कांदा आडत व्यापारी सतीश वाळुंज तर लहान गट सामूहिक नृत्यासाठी ३००१ रु इपितर मराठी चित्रपट निर्माता नितिन कल्हापुरे यांच्याकडुन तसेच सोलो मोठा गटासाठी प्रथम ४००१ रु बक्षीस साई आदर्श मल्टि स्टेट चे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे, द्वितीय ३००१ रु शांती चौक मित्र मंडळ अध्यक्ष दीपक त्रिभुवन, तृतीय २००१ रु राहुरी कारखान्याचे संचालक मच्छींद्र तांबे, चतुर्थ १५०१ वैष्णवीचे अध्यक्ष मच्छींद्र दौंड व उपाध्यक्ष संदीप कदम यांच्याकडुन तर लहान गट सोलो नृत्यसाठी प्रथम ३००१ रु बक्षीस देवळाली नगरपालिकेच्या नगरसेविका सुनीता थोरात, द्वितीय २००१ आरपीआय राहुरी शहराध्यक्ष विलास साळवे तर तृतीय १५०१ शिवचरित्रकार हसन सय्यद यांच्याकडुन दिले जाणार आहे.
महाराष्ट्रदिनी राहुरी फॅक्टरी येथे जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा
Reviewed by Dainik Lokmanthan
on
17:45
Rating: 5