Breaking News

भामटे जोमात पोलीस कोमात ! ठार मारण्याची धमकी देत पोलिसालाच लुटले


राहुरी विशेष प्रतिनिधी - राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे यांच्या हॅलिकॅप्टरला इंधन घेऊन जात असलेल्या वाहन चालकाला वांबोरी रेल्वे गेट परिसरात लुटले. रस्तालूट करणारे जोमात आणि जिल्ह्याची पोलीस यंत्रणा कामात अशी विचित्र परिस्थिती या घटनेवरून पहायला मिळत आहे. 

हा वाहन चालक त्याच्याजवळील वाहनातून एका बॅरलमधून नाशिकहून पाथर्डी येथे इंधन घेऊन जात होता. त्याला राहुरी तालुक्यातील वांबोरी रेल्वे गेट परिसरात काही भामट्यांनी अडवले. त्याच्याजवळील वाहन पेटवून त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देत त्याच्याजवळील रोख रक्कम आणि दोन ग्रॅम सोन्याचे दागिने असा ऐवज घेऊन पोबारा केला. बुधवारी {दि. ११ } मध्यरात्री २ वाजे दरम्यान राहुरी तालुक्यातील खडांबे शिवारात असलेल्या रेल्वेगेट जवळील जगदंबा मंदिरासमोर लुटीची ही घटना घडली. याप्रकरणी नाशिक रोड येथील रहिवाशी असलेले पोलीस कर्मचारी रोहित चंद्रकांत घोडके यांनी फिर्याद दिली.

नाशिक येथून पाथर्डीकडे राज्यमंत्री पंकजा मुंढे यांच्या हॅलिकॅप्टरचे इंधन चारचाकी वाहनात बॅरलमध्ये तो घेऊन जात होता. यावेळी पाठीमागून विना क्रमांकच्या दुचाकीवर आलेल्या तीन तरुणांनी घोडके यांच्या उजव्या साईडच्या दरवाज्याजवळ येत ‘पैसे दे’ असे म्हणत झटापट केली. यावेळी घोडके यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने ‘अंधारात नेऊन इंधनासहित तुझी गाडी पेटवून देऊ’, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. या भामट्यांनी घोडके यांच्या ताब्यातील जीपमधील वाहन चालवण्याचा परवाना व गळ्यातील दोन ग्रॅम सोन्याचा ‘ओम’ तसेच जीपच्या शिटाखाली पाकिटात ठेवलेले ३ हजार ५०० रुपये रोख रक्कम असा ऐवज या भामट्यानी लुटून नेला. जातांना या तिघांपैकी एकाने ‘मयूर चल’ असा आवाज दिल्याचे पोलीस कर्मचारी घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.