Breaking News

‘भारत-चीनच्या नागरिकांनी हिंदी-मँडरिन शिकावी’

बीजिंग - भारत आणि चीनमधील मैत्रीचे संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशाच्या नागरिकांनी एकमेकांच्या भाषा शिकाव्यात, असे आवाहन चीनच्या दौर्‍यावर असलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केले आहे. ‘भारत आणि चीनच्या मैत्रीमध्ये हिंदीचे योगदान’ या विषयावर माध्यामांना त्यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी संवादातील अडथळे दूर करण्यासाठी दोन्ही देशांच्या भाषा समजून घेण्याच्या महत्वावर त्यांनी भर दिला. ज्या प्रकारे आज दोन्ही देशांतील संबंध मजबूत होत आहेत, त्यामध्ये चिनी विद्यार्थ्यांनी हिंदी भाषा शिकणे आणि भारतीय विद्यार्थ्यांनी मँडरिन भाषा शिकणे महत्वाचे आहे. यामुळे जेव्हा तुम्ही भारतात याल किंवा भारतीय चीनमध्ये येतील तेव्हा कोणालाही संवादामध्ये अडचण येणार नाही. दोन्ही देशांचे विदेश मंत्रीही परस्पर संबंध सुधारण्यात जितके महत्वपूर्ण काम करू शकत नाहीत. तितके महत्वाचे काम हे विद्यार्थी करु शकतात, असेही स्वराज म्हणाल्या.