Breaking News

प्रेरणा पतसंस्थेला ४७ लाख रुपयांचा नफा : वाबळे

राहुरी विशेष प्रतिनिधी  - येथील प्रेरणा पतसंस्थेने रौप्य महोत्सवी वर्षात ३६ कोटी २१ लाख रुपयांच्या ठेवीसह ४७ लाख रुपयांचा नफा मिळविला आहे, अशी माहिती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी दिली.ते म्हणाले, की गेल्या २५ वर्षांची रौप्य महोत्सवी वर्षांची वाटचाल करीत असलेल्या या पतसंस्थेने माजी खा. प्रसाद तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवीदार आणि कर्जदारांना मोठा दिलासा देण्याचे काम केले आहे. पतसंस्थेने २०१७/१८ या आर्थिक वर्षात उत्तुंग भरारी घेतली आहे. संस्थेने ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात १९२ कोटी ५२ लाख रुपयांची उलाढाल केली. संस्थेचे खेळते भांडवल ४४ कोटी, वसूल भाग भांडवल ७७ लाख ५१ हजार आहे. संस्थेच्या ठेवी ३६ कोटी २१ लाख, स्वनिधि ४ कोटी ३८ लाख आहे. संस्थेने २६ कोटी ५६ लाख कर्जवाटप केले आहे. हे करत असतांना सामान्य व्यावसायिकांना त्यांच्या जीवनात आधार देण्याचे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याचे काम संस्था करीत आहे. कमीत कमी कागदपत्र, कमी व्याजदर, त्वरित कर्ज वाटप ही या संस्थेची वैशिष्ट्ये आहेत. संस्थेच्या कामात संस्थेचे उपाध्यक्ष अशोक शिंदे यांच्यासह सर्व संचालक, सभासद, ठेवीदार तसेच संस्थेचे व्यवस्थापक जी. एम्. चंद्र आदींच्या सहकार्याच्या पाठबळावर ही संस्था जिल्ह्यात अग्रेसर असल्याचे वाबळे यांनी सांगितले.