Breaking News

तुरीचे १ कोटी बँक खात्यात वर्ग : तनपुरे

राहुरी विशेष प्रतिनिधी  - राहुरी तालुका खरेदी विक्री संघ व नाफेडच्या संयुक्त विद्यमाने खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे १ कोटी १४ लाख रुपयांचे पेमेंट शेतकऱ्यांचे बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष युवराज तनपुरे यांनी दिली.

म्हणाले, राहुरी तालुका खरेदी विक्री संघ व नाफेड यांच्यावतीने शेतकऱ्यांची तूर दि. ९ फेब्रुवारी ते २२ या दरम्यान खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे पेमेंट १ कोटी १३ लाख १४ हजार २०० रूपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात आले. तूर उत्पादक शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष युवराज तनपुरे, उपाध्यक्ष संतोष पानसंबळ संचालक मंडळाने केले आहे. त्याचप्रमाणे राहुरी तालुका खरेदी विक्री संघ व नाफेड यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच हरभरा खरेदी सुरु करण्यात येणार आहे. हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नावे नोंदवावीत, असे आवाहन तनपुरे यांनी केले.