महापुरुषांचे विचार आचरणात आणावे : थोरात
आश्वी : प्रतिनिधी - हल्ली अल्पवयातच कायदे तोडण्याची मानसिकता तरुणांमध्ये निर्माण होत आहे. त्यामुळे समाज अधोगतीकडे चालला आहे. चांगल्या गोष्टी अंगी कारणापेक्षा वाईट गोष्टीचे जास्त प्रमाणात फोफावत आहेत. या पार्श्वभूमीवर जगाला मार्गदर्शन करणाऱ्या महापुरुषांचे विचार आचरणात आणावे, असे आवाहन संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात यांनी केले आहे.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील आश्वी पोलिस ठाण्यात आगामी काळात महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, विविध सण आदी पार पडणाऱ्या उत्सवांनिमित्त आयोजित शांतता बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
ते म्हणाले, महाराष्ट्रातील कोणत्याही कोपऱ्यात गेले तरी समाज एकसारखा दिसतो. मात्र सारखे पाहवयास मिळत नाही. त्यामुळे आपल्याला आपला देश महासत्ता करायचा असल्यास उत्सव काळात कायद्याची बंधने पाळावीच लागतील. तरुणांनी सोशल मिडीयाचा वापर योग्य करावा, असे आवाहन ही त्यांनी केले. यावेळी पोलिस निरिक्षक अनिल कटके, सहाय्यक पोलिस निरिक्षक दत्तात्रय उजे, परिसरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, पोलिस पाटील, पत्रकार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवाजीराव थोरात, माधवराव गायकवाड व आशिष शेळके यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गुप्तवार्ता विभागाचे अनिल शेगाळे यांनी केले. सहाय्यक पोलिस निरिक्षक दत्तात्रय उजे यांनी आभार मानले.