Breaking News

‘औषधनिर्माणशास्त्र’च्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण


प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये राबविण्यात आलेल्या मोफत स्किल अभ्यासक्रम ३० विद्यार्थ्यांनी पूर्ण केला. यशस्वी विद्यार्थ्यांना नुकतेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, अशी माहिती प्राचार्य डॉ. सुनिल निर्मळ यांनी दिली. 

ते म्हणाले, बदलत्या काळानुसार पदवीबरोबरच विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये व्यक्तिमत्व विकास, सवांद कौशल्य, इंग्रजी भाषेचे ज्ञान या गोष्टीला खूप महत्व आहे. याचाच एक भाग म्हणून प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये स्पोकन इंग्लिश कम्युनिकेशन स्किल हा अतिरिक्त मोफत स्किल अभ्यासक्रम राबविण्यात येतो. प्रा. गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील ३० विद्यार्थ्यांनी नुकताच हा अभ्यासक्रम या पूर्ण केला.