टोमॅटोला अवघा तीन रुपये किलोचा भाव,रिकाम्या हाताने परतला शेतकरी
अस्मानी संकटाला सामोरे जाणार्या शेतकर्यांना आता सुलतानी संकटाला तोंड द्यावे लागत आहे.सद्या कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणावर घसरण होत असल्याने शेतकरी संतप्त असतानाच पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटोची विक्रमी आवक झाल्याने भाव कोसळले.
उत्पादन व वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. पिंपळगाव बाजारपेठेत टोमॅटोला प्रतिक्रेट 30 रुपये म्हणजेच दीड रुपया किलो असा भाव मिळाल्याने शेतकर्यांमध्ये नाराजीचा सूर होता.टोमॅटो ची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेचा उल्लेख होतो. टोमॅटोची मोठी आवक असून वाहनांच्या रांगा लागत आहेत. तब्बल 10हजार कॅरेट टोमॅटोची आवक झाल्याचे नमूद करण्यात आले. हमाली वाहतूक खर्चही सुटत नाही एवढा कमी भाव टोमॅटोला मिळत आहे. टोमॅटो तोडण्यासाठी प्रतिक्रेट 15 रुपये, वाहतूक खर्च 12 ते 15 रुपये, एक रुपया कॅरेट हमाली असा एकूण किमान 30 रुपये खर्च येतो. टोमॅटो लागवडीचा खर्च, उत्पादन खर्च, शेतकर्यांचे कष्ट या सर्व गोष्टींचा विचार केला तर शेतकर्याच्या हाती एक रुपयाही मिळत नाही. यामुळे शेतकर्यांनी करायचे तरी काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
टोमॅटो ला एकूण आलेला खर्च
ठोंबरे यांना लागवडीसाठी झालेला खर्च जमीन तयार करणे 8000 रुपये बेड करणे 3000रु मलचिग पेपर विकत घेतला 25000 रुपये
मलचिग पेपर ठाकणे मजुरी 5000रु नर्सरी मधुन टोमॅटो रोपे घेणे 15000 हजार रु रोपे लावणे
5000 हजार रु मजुरी टोमॅटो साठी लगणारे खते शेणखत दोन टक्कर 10000हजार रु बेसल डोस 15000हजार रु टोमॅटो बाधने मजुरी व सुताळी 600000 हजार रु उन्हाळ्यात टोमॅटो असल्यामुळे उन्हापासुन संरक्षण होण्यासाठी मालेगाव येथुन 20000हजार रुपये कपडा आलणा टोमॅटो औषध खर्च 70000हजार रु झालात एकुन लागवडीसाठी क्षेञ अडीच एकर सर्व खर्च 236000 खर्च झालात .
खर्च ही वसूल होत नाही म्हणून शेवटी टोमॅटो आपल्याच घरच्या गुरांना घालण्याची वेळ या शेतकर्यावर आली आहे
द्राक्षला चांगला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून टोमॅटोचे पिक घेण्याचा निर्णय घेतला मोठ्या मेहनतीने प्रयत्न केले आणि खर्च ही त्याच पद्धतीने केला परंतु आज टोमॅटो पिकासाठी जो भाव मिळत आहे त्यात खर्च ही मिळणे कठीण झाले आहे.
_भगवान ठोंबरे,शेतकरी, पिंप्री.