Breaking News

बंद पाईपलाईनच्या विरोधात निळवंडे कृती समितीचा मोर्चा


राहुरी ता. प्रतिनिधी - निळवंडे लाभक्षेत्रातील १८२ गावांतील शेतकरी शिर्डी, राहाता व कोपरगाव या शहरांसाठी होऊ घातलेल्या बंद पाईपलाईनच्या विरोधात निळवंडे पाटपाणी कृती समिती व या क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांनी आज {दि. १९} मोर्चा काढला. यावेळी तांभेरे गुहा परिसरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. नगराध्यक्ष तथा प्रसाद शुगरचे चेअरमन प्राजक्त तनपुरे यांचे अध्यक्षतेखाली निघालेल्या या रॅलीत ते स्वतः सहभागी झाले.

या आंदोलनात रखरखत्या ऊन्हात मोटारसायकलवर बळीराजाच्या न्याय्य मागणीसाठी अहमदनगरकडे निघाले. या रॅलीचे राहुरी बाजारसमितीसमोर चेअरमन अरुण तनपुरे यांनी स्वागत केले. अ. भा. छावा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे, संभाजी ब्रिगेडचे मच्छिंद्र गुंड, मराठा सेवा संघाचे राजेंद्र खोजे यांनीही पाठिंब्याचे पत्र देत स्वागत केले. 

या आंदोलनात कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, उपाध्यक्ष रमेश दिघे, कार्य़ाध्यक्ष गंगाधर गमे, संस्थापक, नानासाहेब शेळके, सचिव उत्तम घोरपडे, सहसचिव राजेंद्र सोनवणे, चंद्रभान गुंजाळ, दत्ता भालेराव, रविंद्र वर्पे, सोमनाथ दरंदले, सुखलाल गांगवे, दादासाहेब पवार आदींसह शेकडो शेतक-यांच्या उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.