Breaking News

वसईत मनसे कार्यकर्त्यांनी केली दुकानांची तोडफोड


मुंबई, मनसेच्या पाडवा मेळाव्यामध्ये पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची सभा झाल्यानंतर रात्री उशीरा वसईतील पाच ते सहा दुकानांची मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. ही दुकाने गुजराती लोकांची असल्याचे सांगण्यात येत आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी लोखंडी रॉडने पाट्या तोडल्या असून गुजराती गाड्यांचीही तोडफोड केली आहे. याप्रकरणी वसई पोलिसांनी गुन्हा दाखल के ला आहे.
 
मुंबई-अहमदाबाद हायवेवरील घोडबंदर ते तलासरी दरम्यानच्या बहुतांश धाबे, दुकाने, हॉटेलवर मराठी पाट्यांऐवजी गुजराती पाट्या दिसून येत आहेत. तसेच वसई तालुका महाराष्ट्रात नव्हे तर गुजरातमध्ये असल्याचे उघडपणे लिहिण्याचे धाडस गुजराती समाजाकडून केले जात होते. याचा मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या सभेनंतर खरपूस समाचार घेत तोडफोड केली.