Breaking News

आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळाचे आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, शेवगाव, येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रकाश गांगर्डे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी कार्यक्रम साजरा करण्याचा उद्देश सांगून सर्वांनी आपल्या मोबाईलवर मराठी भाषा कार्यान्वित करावी. 


या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रोहिदास उदमले यांनी आपल्या भाषणातून विभिन्न प्रदेशातील बोलींच्या उदाहरणांतून मराठी भाषेच्या विविध रूपांची ओळख करून दिली. तसेच मराठीचा वापर दररोजच्या जीवनात जास्तीत जास्त करावा व मराठी साहित्य प्रत्येकाने वाचावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र विद्यालयाच्या अधिव्याख्यात्या सारिका खेडकर यांनी आपल्या व्याख्यानात मराठी भाषेची उत्पत्ती, मराठी भाषेच्या वाङमयाचा परिचय, मराठी भाषेची सद्यस्थिती व महत्व तसेच मराठी भाषेचा गौरव करण्याकरिता प्रत्येकाने मराठी भाषा आत्मसात करावी याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी छात्राध्यापक नामदेव बारगजे याने आपले मनोगत व्यक्त केले. तसेच मान्यवरांच्या हस्ते, छात्राध्यापक प्राशिल फलके, निलेश गायकवाड, अजिंक्य पडोळे, व छात्राध्यापिका लंका जाधव यांनी तयार करून आणलेल्या भित्तिपत्रकांचे विमोचन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन व अतिथी परिचय प्रा. प्रकाश गांगर्डे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राध्यापक सागर ढवळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन छात्राध्यापिका तेजस्विनी खांबट हिने केले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्रा. सुधीर खिल्लारे, प्रा. भगवान बारस्कर, प्रा. राजेंद्र बांगर, प्रा. विक्रम कांबळे, ग्रंथपाल राजेंद्र काळे व कार्यालयीन कर्मचारी शोभा शिंदे तसेच महाविद्यालयाचे छात्राध्यापक उपस्थित होते.