अण्णा हजारे यांच्या आंदोलनासाठी सत्याग्रही स्वराज्य सैनिकांचा जथ्था दिल्लीला रवाना
अहमदनगर (प्रतिनिधी)- देशाच्या व समाजहिताच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दि.23 मार्च रोजी दिल्ली येथे होणार्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आज शहरातून सत्याग्रही स्वराज्य सैनिकांचा जथ्था रेल्वेने रवाना झाला. नगरच्या रेल्वे स्टेशनवर सत्याग्रही स्वराज्य सैनिकांनी कर्नाटक एक्सप्रेसचे नो लोकपाल, नो मोदी स्वराज्य एक्सप्रेस असे नामकरण करीत, तिरंगे ध्वज हातात घेवून नो लोकपाल, नो मोदीच्या घोषणा दिल्या.
अण्णा हजारे शुक्रवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर लोकपाल कायद्याची अंमलबजावणी व्हावी व शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्याच्या प्रमुख मागणीसाठी उपोषण करणार आहेत. या आंदोलनात सक्रीय सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिल्लीला रवाना होत आहे. आज रवाना झालेल्या सत्याग्रही स्वराज्य सैनिकांच्या जथ्थ्यात अॅड.कारभारी गवळी, अशोक सब्बन, भा.को. साळवे गुरुजी, अशोक वाघचौरे, शाहीर कान्हू सुंबे, भाऊसाहेब सुद्रीक, पोपटराव साठे, वीरबहादुर प्रजापती, कैलास पटारे आदिंचा समावेश आहे.
सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारने लोकपाल कायदा लाल फडक्यात गुंडाळून ठेवला आहे. विजय मल्ल्या व नीरव मोदी सारखे दिवाळखोर भांडवलदार कोट्यावधी रुपयांना गंडा घालून परदेशात पळून जात आहे. मोदी सरकार कडून फक्त घोषणांचा पाऊस पाडला जात असून, त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकर्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न गंभीर बनले आहे. अण्णा हजारे यांनी केलेल्या मागण्या सर्वसामान्यांच्या हीतासाठी असून, ते बिनर्शत मान्य करण्याची आशा अॅड.कारभारी गवळी यांनी व्यक्त केली.