Breaking News

ढगाळ हवामानामुळे बळीराजा चिंताग्रस्त

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज {दि. १५} दुपारी उशिरापर्यंत ढगाळ हवामान होते. त्यामुळे शेतातील गहू, हरभरा, ज्वारी, घास आदी पिकांवर मावा रोग येतो की काय, या भितीने बळीराजा चिंताग्रस्त झाल्याचे पहायला मिळाले. अनेक महिने मशागत करून फवारणी आदींवर पैसे खर्च करूनही या नैसर्गिक समस्येमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला तर जाणार नाही ना, अशी भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत.


अनेक ठिकाणी गहू सोंगण्याचे काम बाकी आहे. पावसाच्या भितीने अनेक ठिकाणी गहू सोंगणीला वेग आला आहे. दरम्यान, या समस्येसह जनावरांना होत असलेल्या लाळ्या खुरकत आजाराने बळीराजाची झोप उडाली आहे. शासन आणि जिल्हाप्रशासनाने शेतकऱ्यांना या समस्येतून बाहेर येण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने मार्गदर्शन कारण्याची मागणी होत आहे.