Breaking News

जगदंबा सोसायटीच्या अध्यक्षपदी चांदगुडे; उपाध्यक्षपदी श्रीमती कमलाबाई बादशहा आहेर


तालुक्यातील चासनळी येथे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने स्थापन झालेल्या जगदंबा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रभाकर विक्रम चांदगुडे आणि उपाध्यक्षपदी श्रीमती कमलाबाई बादशहा आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच निवडणूक अधिकारी आर. पी. वाघ यांच्या उपस्थितीत बिनविरोध होऊन संस्थेच्या अध्यक्षपदाची व उपाध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष व संचालकांचे माजी आ. अशोक काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी अभिनंदन केले.संस्थेचे सचिव डी. आर. निकम यांनी आभार मानले.