Breaking News

शिवसेना, शेतकरी सेना कार्यकारिणी जाहीर


कोपरगाव :  शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व संपर्क प्रमुख आ. सुनिल शिंदे, जिल्‍हा प्रमुख रावसाहेब खेवरे खा. सदाशिव लोखंडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका शिवसेना व शेतकरी सेना कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, अशी माहिती कोपरगाव तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी दिली. यामध्ये उपतालुकाप्रमुख सुरेश शामराव गिरे, रंगनाथ गव्‍हाणे, प्रविण शिंदे, राजेंद्र नाजगड, अशोक मुरडणर, रावसाहेब थोरात, शेतकरी सेना संघटक प्रविण शिंदे, मिननाथ जोंधळे, सिताराम तिपायले, महेंद्र देवकर, जालिंदर कांडेकर, रविंद्र जेजुरकर, गंगाधर रहाणे आदींचा समावेश आहे.