Breaking News

नदीपात्रात वाळूतस्करांचा धुमाकूळ,रात्रीच्या वेळी होती तस्करी.....

मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी सुरू आहे. महसूल विभाग चिरीमिरी घेऊन याकडे कानाडोळा करत आहेत. वाळू तस्करीमध्ये अनेक पक्षाचे पदाधिकारी सहभागी आहेत. महसूल विभाग एखाद-दुसरी कारवाई करते थोडाफार दंड वसूल करुन वाहने सोडून देतात. वाळूचे ट्रक, ट्रॅक्टर पाहूनही न पाहिल्यासारखे अधिकारी करतात. 

राज्यातील शहरांचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे बांधकामासाठी वाळूची मागणी वाढली आहे. त्यासाठी लहान मोठ्या नद्यांच्या पात्रातून अमर्यादपणे वाळूचा उपसा होत आहे. पूर्वी गावातील छोट्या मोठ्या बांधकामांपर्यंत मर्यादीत असणारी वाळूची मागणी प्रचंड वाढली आहे. या व्यवसायात अत्याधुनिक यंत्रांनी शिरकाव केला आहे. जेसीबी, पोकलेन, यांत्रिक बोटी अशा यंत्रांच्या मदतीने नदीपात्रातील वाळू उपसून शहरांकडे पाठवली जात आहे. 
या वाळू उपशास आळा घालण्यासाठी सरकारने कडक नियम केले आहेत. परंतू, या नियमांची अंमलबजावणी होत नाही. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच वाळूचा उपसा करण्याचा नियम असला तरी रात्रीच्या वेळेसच वाळूचा उपसा होत आहे. नदीपात्रात वाहने उभी करुन त्यात वाळू भरून चोरट्या मार्गाने गावाच्या बाहेर काढून दिली जातात. यात महसूल विभागाचे हात ओले होतात.
धनेगाव व सोनेगाव हद्दीतून जाणार्‍या खैरी नदीपात्रात वाळूतस्करांकडून रात्रीच्या वेळी जे.सी.बी, पोकलॅन मशीनद्वारे सर्रास वाळूतस्करी सुरू आहे. याबाबत महसूल प्रशासनाला माहीत असून त्यांच्याकडून जूजबी कारवाई केली जात आहे. धनेगावच्या सरपंच यांनी महसूल प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही दखल घेतली जात नाही.