Breaking News

राज्य औद्योगिक महामंडळाच्या भूखंडाचे वाटप पारदर्शी पद्धतीने - सुभाष देसाई


राज्य औद्योगिक महामंडळामार्फत केले जाणारे भूखंडाचे वाटप हे पारदर्शीपणाने होण्यासाठी आन लाईन पद्धतीचा अवलंब केला जात असून ज्या ठिकाणी 20 टक्के भूखंडांचे वाटप बाकी आहे अशा ठिकाणी लिलाव पद्धतीने टेंडर प्रक्रिया राबवून या भूखंडांचे वाटप केले जाते, अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज विधान परिषदेत प्रश्‍नोत्तराच्या तासाला दिली.

देसाई पुढे म्हणाले, भुखंडांचे वाटप करताना भूखंडाच्या जागेवर ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. रत्नागिरी व सिंधूदुर्ग जिल्ह्यातील एमआयडीसी भूखंडांचे वाटप क रतांना अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले होते. यात 158 अर्जदारांचा प्रश्‍न उपस्थित झाला होता. ज्या अर्जदारांनी पैसे भरले आहेत त्यांना मे महिन्या अखेर पर्यंत भूखंडाचे वाटप करण्यात येईल असे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले. उपरोक्त प्रश्‍नाच्या अनुषंगाने सदस्य हेमंत टकले, भाई जगताप, जोगेंद्र कवाडे यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता.