Breaking News

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्‍या भारतीयाला अटक

नवी दिल्ली : सुरक्षा यंत्रणेच्या टीम सोबत यशस्वीरित्या राबवण्यात आलेल्या ऑपरेशनमध्ये पंजाब इंटेलिजन्सच्या सहाय्याने आएसआयच्या इशाऱयावर दहशतवादी कारवाई करणार्‍या टोळीला अटक करण्यात आली आहे. फेसबुकच्या माध्यमातून इसीसमध्ये भरती झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील मोगा जिल्हयातील धलेके गावचा रहिवासी असणाऱया आणि पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱया रवि कुमार याला अटक करण्यात आली आहे. रवी कुमारकडे सेनेच्या अतिमहत्त्वाच्या संस्थांची व सेनेच्या वाहनांचे काही फोटो, संरक्षित क्षेत्रांची हाताने बनवलेले काही नकाशे, सेनेचे टेनिंग मॅन्युअल्सची फोटोकॉपी अशा काही गोष्टी मिळाल्या आहेत.