प्रवाशी वाहतुकीसाठी चोरीची रिक्षा सतर्कतेमुळे आरोपी जेरबंद
शहरातील उपनगरात सोमवारी {दि. १२} रात्रीच्यावेळी एक रिक्षा भरधाव वेगाने जात असताना काही जणांनी दुचाकीवरून तिचा पाठलाग केला. या रिक्षात काही प्रवाशांसह एक महिला घाबरलेल्या अवस्थेत मदतीसाठी जोरजोरात आेरडत होती. तिचे अपहरण होत असल्याची चर्चा पसरली. शेवटी सजग नागरिकांनी ही रिक्षा कशीबशी पकडली. काहीवेळाने पोलीस आल्यानंतर सदर रिक्षा चोरीची असल्याचे स्पष्ट झाले. प्रवाशी वाहतुकीसाठी चोरीच्या रिक्षांचा येथे प्रवाशी वाहतुकीसाठी वापर होतो, हेदेखील या घटनेमुळे अधोरेखित झाले.
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील अनिल नारायण सोनवणे यांच्या मालकीची ही रिक्षा असून येथील संतोष शांताराम वाघ (वय २६) याने ती चोरुन आणली होती. महामार्गावर पोलिस रिक्षा पकडतील, या भितीने त्याने बायपासने रिक्षा येत असतांना शहरात येण्यासाठी काही महिला बायपासला थांबल्या होत्या. त्यांनी हात केल्याने आरोपीने त्यांना रिक्षात बसविले. मात्र त्यांना जेथे थांबायचे होते, तेथे आरोपीने रिक्षा थांबविली नाही. त्यामुळे या महिलांनी आरडाआेरडा करण्यास सुरुवात केली. रिक्षाचालकाने भरधाव नेण्यास सुरुवात केल्याने नागरिकांनीदेखील दुचाकीवरुन त्याचा पाठलाग सुरु केला. अखेर जोर्वेनाका परिसरात रिक्षा पकडण्यात नागरिकांना यश आले. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात वाघ याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पो. ना. पालवे करीत आहेत.