Breaking News

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत तीन प्रकल्प पूर्ण - विजय शिवतारे


पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत 26 प्रकल्प असून, तीन प्रकल्प पूर्ण झाले आहेत. उर्वरित सर्व प्रकल्प , केंद्र शासनाने 3 हजार 830 कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्य शासनाचा हिस्सा 12 हजार 773 केाटी असून त्यासाठी दीर्घकालीन कर्ज केंद्र शासनाने उपलब्ध करून दिले आहे. अशी माहिती जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावास उत्तर देताना विधानसभेत जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी माहिती दिली.

शिवतारे म्हणाले, या 26 प्रकल्पामधून निम्न पांझरा, वारणा आणि डोंगरगाव हे तीन प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. या सर्व प्रकल्पांमुळे 5 लाख 14 हजार हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण होत आहे. तर, 46 टीएमसी नवीन पाणीसाठा निर्माण होत आहे.शिवतारे म्हणाले, या प्रकल्पांसाठी सन 2016 - 17 या आर्थिक वर्षासाठी केंद्र व राज्य शासनाचा एकूण तीन हजार 624.83 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असून, सन 2017 -18 या आर्थिक वर्षासाठी एकूण 1959.27 कोटी खर्च करण्यात आला आहे. डिसेंबर 2019 अखेर 21 प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत.

2018 -19 या वर्षासाठी लाभक्षेत्र विकास कामाकरीता 233 कोटी नियतव्यय असून, सन 2018-19 या वर्षासाठी विस्तार व सुधार कामासाठी 160 कोटीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पाणीपट्टी महामंडळाकडे जमा होणार आहे त्यामुळे दुरूस्ती देखभालीचा खर्च त्यातून करण्यात येणार आहे. अशी माहितीही शिवतारे यांनी दिली.