Breaking News

छेडछाडीला प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने दिले निवेदन


पाथर्डी/प्रतिनिधी/- राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे पाथर्डी तालुका अध्यक्ष अजित चौनापुरे यांच्या वतीने पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांना शाळा महाविद्यालय व इतर शैक्षणिक क्लासेच्या वेळी विद्यार्थीनींना, महिलांना छेडछाडीपासून संरक्षण मिळावे यासाठी निवेदन देण्यात आले.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गेल्या काही महिन्यांपासून शाळा महाविद्यालय व खाजगी क्लासेसच्या वेळी तसेच सायंकाळच्या वेळी मुख्य बाजारपेठ व उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यर्थीनीना व महिलांच्या छेडछाडीच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शहरात छोटेमोठे वाद घडत आहेत. तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी एसटीनी प्रवास करत असताना त्या ठिकाणीही छेडछाडीचे प्रकार घडत आहे. काही टारगट युवक जोरात गाडी चालवुन समोरच्या गाडीला हुल देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे छोटेमोठे अपघात ही घडत आहेत.

तसेच काही मुलीं,युवती आपले शिक्षण बंद होऊ नये पालकांना न काही सांगता निमूटपणे त्रास सहन करतात. त्यामुळे एखादी मोठी घटना घडण्याआधी गांभीर्याने दखल घ्यावी. वरील प्रकार रोखण्यासाठी दामिनी भरारी पथक नेमावे. शाळा- कॉलेज भरत असताना दामिनी पथकाने गस्त घालावी . टारगट व छेडछाडीचे प्रकार करणार्यांवर कडक कारवाई करावी. तसेच सायंकाळी बाजारपेठ, उपनगरात ही गस्त घालावी , तसेच ज्या चौकात जास्त गुन्हेगारी वाढली आहे त्या चौकात सि. सी. टीव्ही कॅमेरे बसवावे.

तरी वरील मागण्याची गंभीरपणे दखल घ्यावी, अन्यथा १४ फेब्रुवारी रोजी पाथर्डी पोलीस कार्यलयासमोर बेमुदत बैठा सत्याग्रह करण्यात येईल. आणि त्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला तर त्याला प्रशासन जबाबदार असेल असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर रोहित रणखांब, सुहास ढाकणे, योगेश वाळके, समीर शेख, फिरोज शेख, विशाल गोसावी, शुभम काळे, नितीन पवार, धीरज मानकर, आदींच्या सह्या आहेत.