Breaking News

जिल्हा सहाय्यक आयुक्तपदी प्राचार्य लालचंद आसावा यांची निवड


सात्रळ / प्रतिनिधी । राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईडच्या जिल्हा सहाय्यक आयुक्तपदी रयत शिक्षण संस्थेच्या, नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालयाचे प्राचार्य एल. बी आसावा यांची नुकतीच निवड झाली. निवडीचे पत्र भारत स्काउट गाईडचे राज्य आयुक्त यांनी नुकतेच त्यांना दिले आहे. प्राचार्य एल. बी. आसावा यांना नुकताच आदर्श राज्य मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, जिल्हा शिक्षणाधिकारी लक्ष्मणराव पोले, प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे, विभागीय अधिकारी एस.पी. ठुबे, आयुक्त काशिनाथ बुचडे, रयत सेवक संघाचे सरचिटणीस भाऊसाहेब पेटकर, कैलास मोहिते, सुनंदा वाखारे, जी.जे. भोर, ए.बी. शिंदे, संभाजीराव चोरमुंगे, बबनराव कडू, प्रगती पतसंस्थेचे चेअरमन अ‍ॅड विजयराव कडू, उपसरपंच गणेश कडू, युवानेते किरण कडू, संजय डुबे, पंकज कडू, उत्तर फौंडेशन, सात्रळचे सर्व सदस्य, रयत सेवक, सात्रळ व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.