सक्षम महिला कर्जत महोत्सव 2018 चे आयोजन. डॉ. सुजय विखेंची संकल्पना
या महोत्सवात प्रदर्शन विक्री व खाद्य महोत्सव होणार आहे. या कार्यक्रमात महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुंचे भव्य प्रदर्शन भरणार आहे. यामध्ये 132 स्टॉल अभारण्यात आलेले असुन हा सर्व कार्यक्रम मोफत आहे. या कार्यक्रमाची संकल्पना व नियोजन डॉ. सुजय विखे यांचे आहे. हा कार्यक्रम दादा पाटील महाविद्यालयासमोर होणार आहे. हा कार्यक्रम मोफत असून या कार्यक्रमास येणार्या प्रेषकांना एक मोफत लकी कुपन दिले जाणार आहे. या लकी कुपनमधून 11 लकी ड्रॉद्वारे वेगवेगळे बक्षीसे दिली जाणार आहेत.
24 फेब्रुवारी रोजी सिनेतारका सोनाली कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. तर 26 फेब्रुवारी डॉ. मिर्झा बेग यांचा हास्याचे फवारे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास ना. राधाकृष्ण विखे पा, ना. शालीनी विखे पा. यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 24 फ्रेबुवारी रोजी डॉ. सुजय विखे पा. यांच्या कर्जत येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.