Breaking News

पिंपरीत एकाच दिवशी बलात्काराचे चार गुन्हे


पुणे : पिंपरी-चिंचवडमधील सांगवी पोलीस ठाण्यात एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलींसह एकूण चार पीडितांनी बलात्कार झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका गुन्हयातील अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेतले असून, उर्वरित तीन गुन्हयांचा तपास सुरू आहे. पहिल्या घटनेत संतोष महाले (रा. पिंपळगाव, नाशिक) या तरुणाने 42 वषीय महिलेस लग्नाचे आमीष दाखवून तिच्याशी जवळीक साधली व त्र्यंबकेश्‍वर व गुजरातमधील सापुतारा अशा ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. दुसऱया घटनेत 17 वषीय मुलीस गणेश मारुती महस्के (रा. ताडीवाला रोड, पुणे) याने लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केले. तिसऱया घटनेत 14 वषीय मुलीवर अजय (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) नावाच्या तरुणाने नाशिक फाटा येथील नदीपात्राजवळ व धोलापूर राजस्थान येथे नेवून बलात्कार केला. तर चौथ्या घटनेत 15 वषीय मजुरी करणाऱया मुलीस हरी गोविंद राठोड (पूर्ण पत्ता नाही) याने लग्नाचे आमीष दाखवून अत्याचार केले.