कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथील बळीराम लालासाहेब पेटकर (वय 35) या शिक्षकाचा मृतदेह सोमवारी भिगवण येथे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.भिगवणमधील साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या आदर्श विद्यामंदिर या शाळेतील उपशिक्षकाचा मृतदेह आढळून आला. हा शिक्षक सतत तणावाखाली असल्याची चर्चा शिक्षक वर्गासह परिसरात आहे. तक्रारवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे येथे हा मृतदेह आढळून आला. भिगवण पोलिसांनी आकस्मित मृत्यू अशी नोंद केली आहे. सोमवारी सकाळी मदनवाडी येथील ब्रह्मदेव वणवे हे गावातून परत घरी सकाळी आले असता, त्यांना दुकानाजवळच्या कट्ट्यावर एक व्यक्ती झोपलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यानंतर बारकाईने पाहता त्याच्या तोंडातून पांढरा द्रव बाहेर पडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनतर त्या व्यक्तीला खासगी रुग्णालयात नेले. नंतर तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वडिलांचे छत्र हरपल्याने कुटुंबाची सर्व जबाबदारी या शिक्षकावर होती. आता त्यांच्या मृत्यूने कुटुंब पोरके झाले आहे.त्यानंतर ही व्यक्ती आदर्श शाळेतील उपशिक्षक असल्याचे पुढे आले.त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले नाही. मात्र हे शिक्षक तणावाखाली असल्याने त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलकंठ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल सातपुते करीत आहेत.
बहिरोबावाडीतील शिक्षकाचा भिगवणमध्ये मृत्यू
Reviewed by Dainik Lokmanthan
on
15:45
Rating: 5