Breaking News

सिद्धेश्‍वर विद्यालयात विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात


कर्जत तालुक्यातील भांबोरा येथील सिद्धेश्‍वर विद्यालयातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला.डॉ. देविदास शेटे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. शिक्षण घेताना संघर्ष करावा लागला तर त्यातून विद्यार्थी घडतात. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची शक्ती निर्माण होते व ध्येयप्राप्ती करता येते असे विचार त्यांनी मांडले. राशिनचे उद्योजक मेघराज बजाज, डॉ. बजरंग काळे, गणपत जगताप, भांबोरा गावचे उपसरपंच कालिदास गावडे, डॉ. चंद्रकांत लोंढे, डॉ. अरुण लोंढे, प्रा. संतोष रंधवे, युवराज लोंढे, गोपीनाथ जगताप, भाऊसाहेब जगताप, बंकट महाराज जगताप, माजी उपसरपंच प्रमोद जगताप, वसंत लोंढे, संतोष गोसावी, चंद्रकांत गावडे, सतीश वाघमारे, छबूराव धेंडे, मुख्याध्यापक मच्छिंद्र बेद्रे, पर्यवेक्षक बाळासाहेब घोरपडे तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांसह विद्यार्थी उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती प्रतिमा पूजन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. शाळेच्या संरक्षण भिंतीचे भूमीपूजन यावेळी करण्यात आले. वासुदेव उद्योग समूहाचे मेघराज बजाज यांच्या वतीने विद्यालयास बेंच भेट देण्यात आले. याप्रसंगी बजाज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बजाज म्हणाले की, प्रयत्न केल्याशिवाय काहीही शक्य नाही, चिकाटी मेहनत या बळावरच आपण यशस्वी होवू शकतो. मेघराज बजाज यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मच्छिंद्र बेद्रे यांनी, तर सतीश पंडित यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जालिंदर सोनवणे यांनी केले. तसेच रोहिदास परकाळे यांनी आभार मानले.