देश विदेशात सायलीच्या हस्तकलेला पसंती
शेवगाव / श. प्रतिनिधी । हस्तकला छंदातून सायली पवार-काटे हिने यु-टयुब चॅनल सुरु केले. त्यावर स्वत: बनवलेले कार्ड, भेटवस्तू यांचे व्हिडीओ अपलोड करुन आपल्या कलेची प्रचिती देश विदेशात पोहचविली आहे. आजतागायात तब्बल 1 कोटी 20 लाख लोकांनी चॅनल पाहिले असून 1 लाख सबस्क्रायबर तीच्या लव्ह फॉर क्राफ्ट या चॅनलवर आहेत. सायली स्वत: माहिती व तंत्रज्ञान अभियंता असून तिने संगणकीय शास्त्रात विशेष अभियांत्रीकी शाखेची पदव्यूत्तर पदवीधर प्राप्त केली आहे.
बी.ई (आय.टी), एम.ई (सी.एस.ई) केवळ छंदापोटी या नविन संकल्पनेला तिने व्यवसायाचे साधन बनविले आहे. वाढदिवस, उत्सव व सण, विशेष दिवस यांच्या शुभेच्छा असणार्या तिच्या कार्डस्ला जगभरातून पसंती व मागणी वाढत आहे. यंत्राशिवाय बनवलेल्या या वस्तू आकर्षकही आहेत. विशेष बाब म्हणजे तिने याचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नसून प्रयोगातून नवनिर्मीतीद्वारे ही कला अवगत केली आहे. महिलांनी घर बसल्या अशी माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात नव उद्योग सुरु करावेत. देशविकासामध्ये पुरुषाप्रमाणेच महिलांचाही वाटा दिवसेंदिवस वाढत रहावा असा तिचा मानस आहे. आपण शिकलो परंतू इतरांपर्यंत आपली कला पोहचवण्याचा तीचा मानस असल्याने वेगवेगळे प्रयोग यु-टयुब माध्यमातून ती स्वत: राबवत आहे. भारतासह अमेरीका, मलेशिया, युरोप, ब्राझील, व्हिएतनाम अशा अनेक देशांतून दिवसेंदिवस या चॅनेलची प्रसिध्दी होत आहे. औरंगाबाद येथील अर्थविषयक अभ्यासक डी. एस. काटे यांची ती कन्या असून सायलीचे पती अजिंक्य पवार हे एका आंतरराष्ट्रीय कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहेत. लग्नानंतर आई वडिलांप्रमाणेच पवार कुटूंबियांनी कोणताही अटकाव न करता आपल्या सूनेस तिची स्वत:ची जगभर एक वेगळी ओळख करुन देणार्या व्यवसायास प्रोत्साहन दिले. तिच्या कलेला दाद तर मिळतेच परंतू सर्वत्र कौतूक देखील होत आहे. आज नवतरुणींसमोर सायली हा एक आदर्श आहे.