वेश्या व्यवसायप्रकरणी फरारी महिला एजंटला अटक
सांगली - वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी फरारी असलेल्या संशयित रिना अनुप सोलंकी उर्फ स्वाती पाटील हिला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने विश्रामबाग परिसरात छापा टाकून अटक केली.
मिरज शहरातील उत्तमनगर येथील ’न्यू पूर्वा‘ या हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांना मिळाली होती. या माहितीआधारे राजन माने यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकुतला बागलगावे, पोलीस उपनिरीक्षक समिक्षा पाटील यांच्या पोलीस पथकाने हॉटेलवर छापा टाकून पीडीत तरूणीसह व्यवस्थापक प्रशांत ऐवळे याला अटक केली होती, तर या छाप्याची चाहूल लागल्याने स्वाती पाटील ही फरार झाली होती.
