10 व्या वृक्षवल्ली प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ
ठाणे,नागरी क्षेत्रातील झाडांचे जतन व्हावे. नवीन झाडांची लागवड मोठया प्रमाणात व्हावी यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या 10 व्या वृक्षवल्ली-2018 या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन ठाण्याच्या प्रथम नागरिक महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या शुभहस्ते पार पडले.
येथील रेमंड कंपनीच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या भव्य प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभास आमदार रविंद्र फाटक,सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, महापालिका आयुक्त तथा वृक्ष प्राधिकरण अध्यक्ष संजीव जयस्वाल, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, वृक्षप्राधिकरण समितीचे सदस्य उपस्थित होते.
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम 1975 चे कलम क्ष (एफ) अन्वये वर्षांतून एकदा फुले, फळे, भाजीपाला व झाडे यांचेप्रदर्शन आयोजित करणे हे वृक्ष प्राधिक रणाच्या कर्तव्यांपैकी एक कर्तव्य मानले गेले असून गेल्या काही वर्षांपासून वृक्ष लागवड त्यांचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभाग विशेष प्रयत्न करीत आहे. प्राधिकरणाच्या माध्यमातून महापालिकेच्या हद्दीमध्ये येणा-या झाडांचे संरक्षण व जतन करणे, दर पाच वर्षांतून वृक्ष गणना करणे, वृक्षारोपण करणा-या व्यक्तींना रोपवाटिकेद्वारे रोप उपलब्ध करून देणे, शहरातील मोकळ्या आणि मोक्याच्या जागी, रस्त्यांच्या लगत, उद्यानांच्या बाजूला, टेकडीवर वृक्षारोपण करून शहरवासियांना मोकळा श्वासमिळावा आणि ह रित ठाण्याची संकल्पना सार्थ ठरावी यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणूनच वृक्षप्राधिकरणाच्यावतीने ‘वृक्षवल्ली’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे.
या प्रदर्शनाच्या निमित्ताने महापालिकेच्यावतीने झाडे, फुले, फळे व भाजीपाला यांची स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास 300 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. प्रदर्शनामध्ये लोकांना आपल्या आवडीची फुलझाडे, फळझाडे, शोभेच्या वनस्पती खरेदीहीकरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सदरचे प्रदर्शन 12 जानेवारी ते 14 जानेवारी या दरम्यान सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत नागरिकांसाठीखुले राहणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
