Breaking News

प्रसारमाध्यमांना सरकारी कार्यालयात प्रवेश बंदी!

डेहराढून : उत्तराखंड राज्यात सरकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांना प्रवेश बंदी लागू करण्याचा आदेश मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत सरकारने जारी केल्यामुळे खळबळ उडाली आहे.उत्तराखंड सरकारने प्रसारमाध्यमांसाठी एक तीन पानांचा आदेश जारी केला. उत्तराखंडचे मुख्य सचिव उत्पल कुमार सिंग यांनी प्रसारमाध्यमांना सरकारी कार्यालयात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश दिला आहे. या नव्या सरकारी आदेशानुसार पत्रकारांना सरकारी कार्यालयांमध्ये प्रवेश बंदी करण्यात आले. 


दरम्यान, आम्हाला गरज पडली किंवा महत्त्वाच्या वेळी गरज असल्यास पत्रकारांना किंवा प्रसारमाध्यमांना बोलविले जाईल. ते सुद्धा रिसेप्शन काऊंटरवर पर्यंत प्रसारमाध्यमांना येण्याची परवानगी असेल. तेथेच संबंधित अ धिकारी प्रसारमाध्यमांना माहिती देतील, असा या तीन पानी आदेशात म्हटले आहे.

प्रसारमाध्यमांना प्रवेश नाकारताना सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले. सरकारी माहिती गोपनीय रहावी यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. उत्तराखंडचे मुख्य सचिव उत्पल कुमार सिंग यांनी 27 डिसेंबरला हा आदेश राज्यातील सगळ्या अधिकार्‍यांना जारी केलाय. त्यामुळे यापुढे पत्रकार सरकारी अधिकार्‍यांना सरकारी कार्यालयात भेटू शकणार नाहीत. 

मुख्य सचिव उत्पल कुमार सिंग यांनी वरिष्ठ आयएएस अधिकार्‍यांनाही बैठकीमध्ये चर्चा होणारी महत्वाची माहिती गुप्त ठेवण्यास सांगितले आहे. प्रसारमाध्यमांपर्यंत योग्य माहिती पोहोचणे हा देखील या निर्णयामागचा मुख्य हेतू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दररोज संध्याकाळी 4 वाजता सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती प्रसारमाध्यमांना दिली जाईल, असे उत्पल कुमार यांनी आदेश देताना म्हटले आहे.