विल्सन आजाराचा सामना करणार्या अक्षय परांजपेशी थेट संवाद
रत्नागिरी, दि. 04, जानेवारी - सामाजिक दायित्वाची जबाबदारी स्वीकारून स्थापन झालेल्या वीरश्री ट्रस्टचा चौथा वर्धापन दिन येत्या 7 जानेवारीला असून यावेळी विल्सन आजाराने त्रस्त असूनही आनंदी जीवनाची गुरुकिल्ली देणारा रत्नागिरीचा अक्षय परांजपे आणि त्याच्या आईवडिलांची प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे. मुलांना त्यांचे कलागुण सादर करण्याची संधी वीरश्री ट्रस्टतर्फे देण्यात येणार आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे यांनी याबाबतची दिली. समाजातील पीडितांना, गरजूंना मदतीचा हात पुढे करण्यासाठी, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विरीश्री ट्रस्टची स्थापना करण्यात आली. ट्रस्टच्या उद्घाटनाला सिंधुदुर्ग येथील अनिता साळगावकर ही अपंग मुलगी उपस्थित होती. अपंग असूनही जिद्दीने आयुष्य जगणार्या अनिताने त्यावेळी सर्वांना प्रेरणा दिली होती. त्यानंतर प्रसाद घाडी या जन्मापासून स्पायनल मस्क्युलर या रोगामुळे मज्जातंतू अत्यंत क्षीण असलेल्या मुलाची आई शरयू घाडी हिच्या प्रकट मुलाखतीचा क ार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये त्यांनी मांसपेशींची सतत झीजही होत असूनही वयाच्या 21 वर्षापर्यंतच जगलेल्या तरीही राष्ट्रपतींनी कौतुक केलेल्या, कवी, गायक, हुशार विद्यार्थी म्हणून नावाजलेल्या प्रसादची कहाणी यावेळी उलगडली होती. या कार्यक्रमामध्ये वीरश्री ट्रस्टच्या माध्यमातून वीरेंद्र चव्हाण, धीरज साटविलकर, अनिकेत चिपळूणकर, सुयश्री कोतवडेकर, गायत्री घाटे, मासुमा गोलंदाज, राहूल गोळपकर या विशेष मुलांचा सत्कार करण्यात आला होता. गेल्या वर्षी मंडणगड तालुक्यातील घराडी येथील ‘स्नेहज्योती’ या एकमेव निवासी अंध शाळेतील गुणवान दृष्टिहीन मुलांचा ‘तिमिरातुनी तेजाकडे’ हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ट्रस्टतर्फे वर्षभर मुलांच्या सर्वांगीण विकासाठी दर महिन्याला एक उपक्रम राबविण्यात आला होता.