मुंबई : राष्ट्रीय कृषी बाजार समिती मार्फत चालविण्यात येणारे ई-नाम हे पोर्टल शेतकर्यांच्या हिताचे असून, शेतमालासाठी राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध झाली आहे, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी काढले. राष्ट्रीय कृषी बाजार समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. ई-नाम हे राष्ट्रीय स्तरावरील वेब पोर्टल असून त्याद्वारे सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांबाबत माहिती एकत्रित ठेवण्यात येते. या पोर्टलसंदर्भात आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, या पोर्टलसाठी येणार्या सर्व अडचणी दूर करुन त्यासाठी लागणारे तांत्रिक सहकार्य, मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांसाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल. राज्यातील सर्व बाजार समित्यांनी मध्यस्थांची भूमिका बजावून देशातील उत्तम बाजारपेठ तयार करण्यास मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले. कर्जमाफी साठी एकत्रित केलेला शेतकरी आणि त्यांच्या बँक खात्याचा डेटा, तसेच तालुक्यातील सर्व शेतकर्यांचा डेटा एकत्रित करुन या पोर्टल सोबत लिंक करून मास्टर डेटा तयार ठेवावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
शेतमालासाठी राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध : मुख्यमंत्री
Reviewed by Dainik Lokmanthan
on
09:14
Rating: 5