Breaking News

भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांचा आरपीआयमध्ये प्रवेश


मुंबई,  - प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत कसारा येथील भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या नेतृत्वात आज रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला.भिमाकोरेगाव येथे आंबेडकरी जनतेवर झालेल्या हल्ल्यानंतर आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. एकूणच या प्रकरणात आंबेडकर यांची भूमिका पटणारी नाही. त्या तुलनेत रामदास आठवले यांची समाज जोडणारी भूमिका असल्याचे मत भारिप बहुजन महासंघाचे पदाधिकारी सुहास जगताप यांनी व्यक्त केली. जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज बांद्रा येथील संविधान निवासस्थानी आठवलेंची भेट घेऊन आरपीआयमध्ये प्रवेश केला.