Breaking News

प्रज्ञा वाळकेंच्या अपहाराने मुख्यमंत्र्यांच्या कारभाराच्या पारदर्शक चिंध्या


मुंबई/शहर प्रतिनिधी : करोडोंचा घोटाळा करूनही कारवाई टाळण्यात यश मिळवलेल्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके या सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्ट लॉबीच्या आयडाल बनल्या आहेत. विशेषतः आठ आमदारांचे पत्र मिळवण्यासाठी प्रज्ञा वाळके यांच्या कौशल्याचे विशेष कौतूक केले जात असून पारदर्शक कारभाराच्या नाकावर टिच्चून हा सारा प्रपंच सावरला जात असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रीमंडळासह प्रशासनावरीला पकड सैल होत असल्याची अशंका व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा कारभार हाती घेतल्यानंतर प्रशासकीय पातळीवर भ्रष्टाचारी अधिकार्‍यांचे धाबे दणाणले होते. ना खाऊंगा ना खाने दुंगा ही पंतप्रधानाची आरोळी आणि स्वच्छ शासन पारदर्शक प्रशासन ही मुख्यमंत्र्यांची डरकाळी सतत कानावर येत असल्यामुळे प्रशासन भ्रष्टाचारापासून दुर राहण्यासाठी विशेषत्वाने खबरदारी घेत होते. त्यातच छगन भुजबळ यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर कारवाई करण्यासाठी दाखवलेली तत्परता, सोबत सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अभियंत्यांवर झालेली अटकेची कारवाई या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंते ताकही फुंकून पीत होते.


मात्र ही परिस्थीती फार काळ टिकली नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महत्वाकांक्षेवर मात करण्याचे कौशल्य अवगत असलेले काही अभियंते आजही सार्वजनिक बांधकाम खात्यात कार्यरत असल्याची प्रचीती येऊ लागली. या अभियंत्यांमध्ये कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांचा वरचा क्रमांक लागतो, हे गेल्या दोन तीन वर्षाच्या साबांतील विविध घडामोडींमधून स्पष्ट झाले आहे. प्रज्ञा वाळके यांनी आपले कौशल्य जिथे पणाला लावले त्या शहर इलाखा शाखेत सन 2014 ते सन 2017 या तीन वर्षाच्या कालखंडात तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांनी पारदर्शकतेच्या चिंध्याही भ्रष्टाचाराच्या बाजारात विकल्या. त्यात प्रज्ञा वाळके यांनी कळस केला. आमदारांच्या कक्षांच्या भितींचे पापुद्रेही लिलावात काढून आपले इप्सीत साधले. प्रज्ञा वाळके मनोरा आमदार निवास इमारतीच्या कामात अपहार करून थांबल्या नाहीत तर नाइलाजास्तव का होईना झालेल्या चौकशीत प्रकरण अंगलट येते आहे याची चाहूल लागताच आमदारांनाही या पापात सहभागी करून घेण्यात वाळके यशस्वी झाल्या.


आजमितीस आठ आमदारांची सहानुभूती मिळवण्यात प्रज्ञा वाळके यशस्वी झाल्याचे आमदारांच्या पत्रांवरून 
स्पष्ट होते. प्रज्ञा वाळके यांचा हा अपहार माध्यमं आणि विधीमंडळात चर्चेच्या माध्यमांतून गदारोळ घालीत असतानाही प्रज्ञा वाळके त्या आठ आमदारांना आपल्या पक्षात खेचण्यात यशस्वी झाल्याने अस्सल, बेरकी राजकारणीही आश्‍चर्यचकीत झाल्याचे बोलले जात आहे. या आठ आमदारांवर प्रज्ञा वाळके यांनी कोणती जादू केली? आठ आमदारांची वेगवेगळ्या दिनांकांची आणि सालाची पत्रे एकाच दिवशी आवक वहीत नोंदली जाऊनही त्या आठपैकी एकही आमदार सत्य सांगण्यासाठी पुढे का येत नाही यावर आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. एकूणच मुख्यमंत्र्यांच्या डरकाळीलाही प्रज्ञा वाळके यांनी भीक न घातल्याने देवेंद्र फडणवीस यांची निदान साबां प्रशासानावरील पकड नक्कीच ढीली झाल्याचे सांगितले जात आहे.

प्रज्ञा वाळकेंना वाचविण्यासाठी अरविंद सुर्यवंशींची दुहेरी चाल
शहर इलाखा विभागातील मनोरा आमदार निवास इमारतीच्या अपहाराची संधी साधून प्रज्ञा वाळके यांच्या खांद्यावर बंदूक ठेवणारे मुंबई साबांचे अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी साबां मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना बदनाम करण्यासाठी प्रज्ञा वाळके अपहाराचा वापर करीत आहेत. एका बाजूला प्रज्ञा वाळके दोषी आहेत हे जाहीर करायचे आणि त्याचवेळी चंद्रकांत दादा पाटील यांना खोटी माहिती देऊन अंधारात ठेवायचे. आणि पुन्हा हेचा अधिक्षक अभियंता रात्री अपरात्री आ. चरणभाऊ वाघमारे यांच्या कक्षात जाऊन प्रज्ञा वाळके यांना चंद्रकांत दादा यांचे अभय असल्याची कळ लावतात. या अधिक्षक अभियंत्यांचा पर्दाफाश मंगळवारपासून क्रमशः