Breaking News

केजरीवाल हाजीर हो.


नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आयोग अर्थात सीआयसीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मुंबईच्या केतन मोदी यांनी दाखल केलेल्या आरटीआयसंबंधी समक्ष हजर होण्याचे निर्देश दिले आहेत. केजरीवाल आयआरएस अधिकारी असतानाच्या सेवेचा अहवाल आणि त्यांच्याकडून चालविण्यात आलेल्या स्वयंसेवी संस्थेची माहिती अर्जदाराने मागविली आहे. केजरीवाल यांनी हजर राहावे किंवा आपल्या अधिकृत प्रतिनिधीला पाठवून द्यावे, असे माहिती आयुक्त बिमल जुल्का यांनी म्हटले आहे.