ठाणे : कळव्यामध्ये एक महिला आणि तिच्या दोन मुलांचे मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आले आहेत. मृत महिलेचे नाव मंदा जयेंद्र पाटील असून ही महिला पडलेगावाची रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. महिलेसह तिची मुलगी आणि मुलगा या दोघांचाही मृत्यू झाला आहे. मंदाने मुलांसह आत्महत्या केली, कि तिची हत्या करून मृतदेह रेल्वे रुळावर आणून ठेवला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काल रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
कळव्यात महिलेची चिमुकल्यांसह आत्महत्या
Reviewed by Dainik Lokmanthan
on
10:54
Rating: 5