Breaking News

राष्ट्रवादीतर्फे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

जळगाव,  जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यस्तरीय जनजागृती अभियानांतर्गत नागपूर येथून सुरू झालेल्या 20 डिसेंबर 2017 रोजी रथयात्रेला सुरू वात झाला असून पारोळा येथे दाखल करण्यात आली. तर आज, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती मागण्यांसह विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.


मागासवर्गीय आयोगावार ओबीसी समाजाचा अध्यक्ष असावा, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृत करावे, ओबीसीची जातनिहाय जनगणना जाहिर करून त्यांना नितीआयोगाकडून निधी वेगळी तरतूद करावी, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला 5 हजार कोटी भांडवल द्यावे, उद्योग व्यवसायासाठी 10 लाखांपर्यंत कर्ज मर्यादार वाढवावी, क्रिमिलेअरची अट रद्द करावी, स्वामीनाथ समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करा, मंडल कमीशनची 100 टक्के अंमलबजावणी करा, शेतक-यांच्या मुलीच्या लग्नासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करा, शेतक-यांच्या तरूण मुलांना उद्योगासाठी शुन्य व्याज दरावर कर्ज उपलब्ध करून द्या, ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, महानगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षण आहे. पण पुढे विधानसभा लोकसभेत ओबीसींना 27 टक्के आरक्षण मिळाले पाहिजे, तीन वर्षांपासून प्रलंबित शिष्यवृत्ती व फ्रिशिप ताबडतोब अदा करावी, स्पर्धा परिक्षेत महिलांना नॉनक्रीमिलेअरची जाचक अटी रद्द करण्यात यावी.