Breaking News

नांदेड : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात दोन गटात हाणामारी ; ५ जखमी

नांदेड : नांदेडमधील मुगट येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात दोन गटात झालेल्या हाणामारीत ५ जण जखमी झाले आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरू असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान दोन गटात वाद झाला. यानंतर वादावादीचे रुपातंर हाणामारीत झाले. या प्रकरणी पोलिसांनी १२ जणांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.