प्रजासत्ताक दिनानिमित्त विधानभवनात ध्वजारोहण
मुंबई : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन येथे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते व विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधानपरिषदेचे उप सभापती माणिकराव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विधानसभेचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात, विधानपरिषद सदस्य संजय दत्त, विधानपरिषदेच्या सदस्या श्रीमती हुस्नबानो खलिफे तसेच विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव, डॉ.अनंत कळसे, सचिव उत्तमसिंग चव्हाण, सह सचिव अशोक मोहिते, उप सचिव विलास आठवले, शिवदर्शन साठ्ये, राजेश तारवी, ऋतुराज कुडतरकर, सभापतींचे सचिव महेंद्र काज, अध्यक्षांचे सचिव, राजकुमार सागर, अवर सचिव रविंद्र जगदाळे, सुनिल झोरे, रंगनाथ खैरे, यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य सुरक्षा अधिकारी प्रविण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीसांकडून मानवंदना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव प्रवीण दराडे अन्य वरिष्ठ अधिकारी पोलीस तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते.
