बीजिंग : डोकलाम वादानंतर चीनने आता भारताच्या विरोधात नवी आगळीक केली. भारताचा अविभाज्य हिस्सा असणाऱया अरुणाचल प्रदेशचे अस्तित्व आपण कधीच मान्य केलेले नाही, अरुणाचल दक्षिण तिबेटचा हिस्सा असल्याचे वक्तव्य चीनने बुधवारी केले. यादरम्यान अरुणाचल प्रदेशात सैनिकांच्या घुसखोरीबद्दल चीनने सोयीस्करपणे मौन बाळगले. चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी अरुणाचलमधील घुसखोरीच्या वृत्तानंतर उपस्थित झालेल्या प्रश्नांवर बोलताना हे वक्तव्य केले. चिनी सैनिक अरुणाचल प्रदेशच्या सियांग जिल्हयात 200 मीटर आतवर घुसल्याचे वृत्त समोर आले होते. सीमा मुद्यावर आमची भूमिका नेहमीच स्पष्ट आणि एकसमान राहिली आहे. अरुणाचल प्रदेशचे अस्तित्व आम्ही कधीच मान्य केलेले नाही असे गेंग म्हणाले.
चीनची नवी आगळीक
Reviewed by Dainik Lokmanthan
on
05:50
Rating: 5